*शुगर फ्री शरीर क्षारपड फ्री जमीन साखर फ्री स्वयंपाक घर डायबेटिस फ्री विश्व. तर चला गावाकडे, गुऱ्हाळावर गूळ बनवायला*
__पक्के नियोजन व्हावे म्हणून सगळकांही व्यवस्थित वाचा.__

एका वारकरी घरातली एक माय माझ्या चिकित्सालयात माझ्यापुढे गाऱ्हाणं घालत होती. मी कधी हाटेलात जेवली नाय, मटण खाल्ले नाय, टायमात मुलंबाळं लग्नबिग्न सगळं झालं. अजून अर्ध वय झालं नाय तवर डाकटरन पिशवी काढली, गुडघ बदलायला सांगितल्यात, साखर झा ल्या, जेवान जात नाही, जीव नुसता खाली वर हुतुया त्यात संडास साफ होत नाही. शेजारणीला कॅन्सरन नेलं तवापासण कंबर बसलिया!

ही अवस्था असेल तर समजून घ्यावे की अन्नहवापाणी, शेती, औषधी बद्दल आपण किती सजग आहोत.
*साखर तथा शुगर…जगात आम्ही नंबर ONE.*

शरीरात साठणाऱ्या शुगरने म्हणजे मधुमेह, डायबेटिस… स्थौल्य, जाडी… हृदयरोग, हार्ट डिसीज… वृक्करोग, किडनी फेल्युअर… वंध्यत्व… वृद्धत्व… ते कॅन्सर इ. नंबर ONE.

साखरेसाठी शेतात लावलेल्या ऊस नामक नगदी पिकापासून… क्षारपड जमीन, पाण्याचा भयानक वापर, पिकांची वैविध्यता नष्ट, कृषी संस्कृती व्हेंटिलेटरवर, एकच पीक पद्धतीने फायदा एकच पण नुकसानीच्या वाटा अनेक, खर्चाचे रस्ते जास्त, एकत्रित कौटुंबिक नियोजन संपुष्टात, प्रदूषण, जमिनींना, जंगलांना आग इ… नंबर ONE.

वर्षभर भाजीपाला, धान्ये, कडधान्ये, फळे हे सगळं प्लास्टिक च्या पिशवीतून आणि दूध सुध्दा इ… नंबर ONE.

100 एकर ऊस उत्पादक यांना एक लिटर स्वच्छ देशी गाईचे दूध मागितले, एक किलो मूग मागितला, त्यांच्याच घरातल्या काविळीच्या पेशंटला खायला रोज एक नैसर्गिक ऊस मागितला, त्यांच्या बायकोच्या पोकळ हाडे भरायला देशी गूळ आहे का हो तुमच्याकडे? एका कुटूंबाला फक्त वर्षाकाठी काही क्विंटल पण गूळ लागत नाही… पण यांचे साखर उत्पादन सहस्त्र टन आहे. घरात कोट्यावधी चलन येते पण प्रत्येकाला शुगर आहे. मूड बदलण्यापासून ते गर्भाशय काढण्यापर्यंत, ऍसिडिटी ते डायबेटीस, बीपी, कॅन्सर आहे. पण एक किलो हादग्याचे फुल इथे नाही की एक मेथीची पेंडी. मग खपली गहू, शंभरीतील आजीआजोबा, माईनमुळ्याचे लोणचे, जातं, मुसळ कुठून येणार?

वैद्य, डॉकटर जे आरोग्याची काळजीवाहू आहेत त्यांच्या घरची परिस्थिती वेगळी असेल का?
अनेकजण आज आजार, आरोग्य, देशीविदेशी औषधी, हॉस्पिटल्स मध्ये काम करत आहेत त्यांना याची जाणीव आहे?

सरकार, राजकारण, भांडवलशाही, कारखानदारी, कर्जे, सावकार यंत्रणा सोबत भांडण करण्यात वेळ घालवून नैराश्य पदरात पाडून, भिकेचे हात पसरण्यापेक्षा. खरंच आपण योग्य आहोत का? आपण नेमके काय करतोय? दुसऱ्याला बोटं दाखविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

चला तर…
ऊस हे गवत आहे, ते वर्षायू आहे, कुठेही येते, एकदा लावले की आयुष्यभर मरत नाही?

जिथे जिथे पडीक जमीन आहे तिथे तिथे लावून उपजाऊ जमीन इतर पिकांसाठी रिकामी केली तर?

देशी गाईपासूनच्या दुधापासून ते अन्नपाण्यापर्यंत सर्वकाही अगदी जमिनीच्या कमी तुकड्यात करता आले तर?

जरासुद्धा ऊसासाठी जमिनीचे क्षेत्र वाया न जाऊ देता, एक थेंबही पाणी न वापरता, एक कणसुद्धा केमिकल, सेंद्रिय खत सुध्दा न वापरता, अगदी शेणखत, गोमूत्र सुध्दा न वापरता, ना फवारणी, ना औषधी, ना तणनाशके ना कीटकनाशके. आणि गंम्मत म्हणजे रोज असा चावून खायला ऊस मिळाला तर…
तोही सगळ्याच जातीचा एकाच ठिकाणी.

तेही आंतरपीक म्हणून. हो हो हो ऊस आंतरपीक म्हणून घेता येतो.

ना खोडवे ना नेडवे एकदाच लावा आणि विसरून जा. आयुष्यभर बेणे शोधण्याची गरज नाही की रान पेटविण्याची.

वर्षभराचा गोडवा, गुळातला गवतीचहा, गूळ, काकवी, खांडसर, खंडशर्करा, खडीसाखर इतके पारंपरिक घरी बनविता आले तर…

ऊसाची गोड पांढरी साखर सर्व आजारांचे मूळ आणि डोक्यात घालते पैशाचे खूळ… का?

 ऊस आहे अतिऔषधी. हो ऊस आहे अतिऔषधी.

बिघडलेले स्वादुपिंड शुगर, डायबेटिस तयार करते पण नैसर्गिक ऊस त्या स्वादुपिंडाचे पोषण करतो. मळीची दारू ने खराब झालेल्या लिव्हर, काविळ चा पक्का बंदोबस्त आणि चॉईस ऑफ ड्रग हा नैसर्गिक ऊस च आहे. फक्त चावून खायला हवा.

*कार्यक्रमाची रुपरेषा व नियोजन*
= *

 _1. सोमवार 11 डिसेंबर 2017 ला पहाटे 05.30 AM ते सकाळी 08.30 AM _

पहाटे साडेपाच वाजता…. पाषाण वरून सुस ला जाताना NH4 च्या हायवेवरील पूल ओलांडून लगेचच डाव्या हाताला DC चे कार शोरूम आहे तिथे जमावे. उजव्या बाजूला ऑडीचे शोरूम आहे.

 शेती विषय म्हंटला की पहाटे आणि पहाटेच… पहाटे शेतात जाणाऱ्याला यम सुध्दा घाबरतो…

गवतीचहा तोही देशी गुळाचा. सोबतच ऊसाचा गोडवा चाखा आणि पहा उसाच्या किमान 20 जाती. नाव न घेता. सोबतच नैसर्गिक शेतीचा अनुभव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहायला मिळेल जवस, तूर, हुलगा, हादगा, शेवगा, कवचबीज, रताळे, साबुदाणा, केळी, खपली गहू, फळझाडांचे खूप सारे प्रकार, मसाल्याची झाडे, कांदा, लसूण, बेल, पारिजातक, झेंडू, सदाफुली, मखमली, सोनचाफा, कापसाचे झाड, आंबडी, वांगी, नारळाच्या सर्वच व्हरायटी, सीताफळ, रामफळ, जमिनीतील कंद, हळद, करांदे आणि सुरण सुध्दा. बरच काही अजूनही. आयुर्वेदिक वनस्पतींचे जीवन्त कुंपण व उत्पादन. यावर्षीचा ऊस तुटणार असल्याने तो पाहण्याची या वर्षीची शेवटची संधी.

सोबत फूड तथा हर्बल फॉरेस्ट कसे बनवायचे याची माहिती. सगळ्याच गोष्टीचे कायस्वरूपीचे जंगल बनवून रोजच उत्पादन देणारी 3 एकराची परसबागेची सफर.

*2. शुक्रवार 15 डिसेंबर 2017 चा पहाटे पासून ते रात्री पर्यंत चा दिवस काढून ठेवा. या दिवशी पूर्ण सुट्टी ठेवा. या दिवसाचे नियोजन सोमवारी दिले जाईल. यादिवशी काय पहाल? काय कराल? * ????

 a. केमिकल वापरून गूळ, काकवी चे मोठ्या प्रमाणात कमर्शियल पद्धतीने उत्पादन कसे करतात? ते टाळावे का नको? याचे मार्केट कसे आहे? याची नेमकी उत्तरे आणि वास्तव तथा सत्य.
b. ऑरगॅनिक ऊस शेती व त्याचे 100 टक्के गूळ, काकवी बनवून ते स्वतः कसे विकावे? याचे मार्केट कसे आहे? याची नेमकी उत्तरे आणि वास्तव तथा सत्य. याचे प्रत्यक्ष शेतावर भेट तसे मार्गदर्शन.
c. नैसर्गिक ऊस शेती, सर्व आंतरपिके घेऊन कशी शेती करावी आणि गूळ, काकवी, पापडी, चिक्की, तिळगुळ, शेंगदाणा गूळ हे सर्व घरच्या घरी बनवून त्याचे इतर पदार्थही बनवून कसे घरीच विकायचे तेही टनात याचा प्रत्यक्ष अनुभव.
d. या दिवशी गुऱ्हाळावरच तसेच शेतावरच चटणी, भाकरी इ. सम्पूर्ण भोजनाचा सकाळ – सायंकाळी चाही आस्वाद.
e. एकाच शेतात पाच पाच, दहा दहा वर्ष्याच्या अनेक जातीच्या उसाच्या पिढ्या पहा.
f. ऊस, काढणी, वाहतूक, गुऱ्हाळ लावणे, गूळ, काकवी काढणे या सगळ्या प्रक्रिया स्वतः करण्याची संधी.
g. एकाच शेतात चाळीस प्रकारच्या उसाच्या जाती पाळणारा अवलिया पाहूया! असं बरंच काही.
15 तारखेचे सम्पूर्ण नियोजन 10 तारखेला सोमवारी सांगण्यात येईल.????

लिमिटेड 30 जण नोंदणी फक्त. प्रथम नोंदणी प्राधान्य दिले जाईल. हो स्त्रियांनी देखील नक्कीच सहभागी व्हावे.

*नोंदणी फी 1500/- रुपये मात्र.*
(प्रवास खर्च व जबाबदारी सोडून. सोय एकटे, ग्रुप मध्ये करू शकतो. याचे नियोजन सोमवारी करण्यात येईल.)

बँकेत जमा करण्यासाठी,
Jnanayogayu Private Limited
A/C = 250000839950
Induslnd Bank limited
Aundh Branch
IFSC:INDB0000269

 फी जमा झाल्यावरच नोंदणी पक्की केली जाईल. नंतर व्हाट्सअप्प ग्रुप वर ऍड करण्यात येईल. PAYMENT झाल्यानंतर कृपया व्हाट्सअप्प वर डिटेल पाठवा.
Dr. Santosh Suryawanshi = 8888839950; Dr. Nilesh Londhe = 9881572395; Dr. Manisha Suryawanshi = 8888839951; Dr. Shyamsundar Jagtap = 9604929004; Dr. Sangita Waghmode = 9850725585; Jitendra Holmukhe, Ganesh =9595821515

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *